
दिल्ली :- भाजपाचे (BJP) अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (Union Ministry of Home Affairs) तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली. आयपीएस अधिकाऱ्यांना पश्चिम बंगालमधून दिल्लीत प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आले. जे.पी. नड्डा यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील बेजबाबदारपणामुळे ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईवर तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गृह मंत्रालयावर पश्चिम बंगालच्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवणे हा गृह मंत्रालयाकडून दबाव टाकण्याचा प्रकार आहे. असे करून आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली जात आहे.
भाजपाच्या नेत्यांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भाजपा नेते आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. सोशल मीडियावर (Social Media) या संदर्भात केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणालेत, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्यांवर विटा फेकल्या जात आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावरही हल्ल्याचा कट रचला गेला. मात्र आम्ही सहिष्णुता सोडत नाही. दगडाचे उत्तर फुलांनी देऊ, आमचे कमळ राज्याला नवी ओळख देईल.
जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये दगडफेक झाली होती. नड्डा सुरक्षित राहिले. मात्र भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अन्य जखमी झालेत. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीन एफआयआरची नोंद केली व सात जणांना अटक करण्यात आली आहे.
Three IPS officers from West Bengal have been called on central deputation for alleged lapse in security of BJP president JP Nadda: Government Sources
— ANI (@ANI) December 12, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला