फीचे २१७ कोटी रोख घेणाऱ्या वकिलावर टाकली धाड

Bribe

चंदिगड :- चंदीगडमधील एका वकिलाने फी म्हणून अशिलांकडून २१७ कोटी रुपये रोख घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने धाड टाकली व त्याची इतर शहरातील बेहिशेबी संपत्ती शोधून काढली.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार आयकर खात्याने हरियाणा आणि दिल्लीमधील ३८ ठिकाणी धाडी टाकल्यात. साडेपाच कोटी रुपये रोख जप्त केलेत. या वकिलाची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

त्याचे १० बँक लॉकर्स सील करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिली आहे. वाद मिटवण्यासाठी वकील अशिलांकडून मोठ्या रकमा रोख घेत असल्याचा संशय होता. गेल्या अनेक वर्षांपासून केलेली गुंतवणूक आणि बेहिशेबी रकमेची कागदपत्रं सापडली आहेत.

वकिलाने एका ग्राहकाकडून ११७ कोटी रुपये रोख घेतले आणि रेकॉर्डवर फक्त चेकने घेतलेले २१ कोटी दाखवले, असा आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने केला आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात त्याने एका कंपनीकडून १०० कोटी रुपये घेतले होते, असा आरोप आहे.

वकील हा बेहिशेबी पैसा निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकत घेण्यासाठी व शाळांच्या ट्रस्टमध्ये वापरत होता. त्याने महागड्या परिसरात  गेल्या दोन वर्षांत  सुमारे १०० कोटींपेक्षा जास्तची संपत्ती विकत घेतली आहे, असेही चौकशीत आढळले. त्याने हवालामधूनही पैसे कमवले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER