
कोलकाता :- पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भाजपाध्यक्ष (BJP) जे. पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. नड्डा हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात जात होते.
यावेळी जे. पी. नड्डा (J P Nadda) आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. दक्षिण २४ परगणामध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषचा आरोप आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या दरमम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली. सुरक्षा यंत्रणांनी नड्डा याच्या ताफ्याला सुरक्षित बाहेर काढलं. दरम्यान, टीएमसीने जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याच्या काही तासांपूर्वी भाजप नगराध्यक्ष सुरजित हल्दरवर हल्ला केला.
नड्डांच्या स्वागतासाठी जेव्हा भाजपचे कार्यकर्ते झेंडा आणि पोस्टर लावत होते तेव्हा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला, असा आरोप भाजपने केला आहे. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्यापूर्वी झेंडे आणि बॅनर लावत असताना १०० पेक्षा जास्त टीएमसी कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांनी आम्हाला जबर मारहाण केली.
तसेच, मला जीवानिशी मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत आमचे १०-१२ कार्यकर्ते जखमी झाले आहेत, अशी माहिती भाजप नगराध्यक्ष सुरजित हल्दरने सांगितली. भाजपाने केलेल्या आरोपांवर तृणमूल काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी म्हटलं आहे की, “त्यांचेच गुंड हिंसाचार करत आहेत.” आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. हा सर्वसामान्यांचा निषेध होता, असे ते म्हणाले आहेत. दुसरीकडे टीएमसीचे नेते हकीम यांनी भाजपा बाहेरील लोकांना राज्यात आणत असून राज्य सरकारला याची माहितीही देत नसल्याचा आरोप केला आहे.
बंगाल पुलिस को पहले ही राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी के कार्यक्रम की जानकारी दी गई थी, लेकिन एक बार फिर बंगाल पुलिस नाकाम रही। सिराकोल बस स्टैंड के पास पुलिस के सामने ही #TMC गुंडों ने हमारे कार्यकर्ताओं को मारा और मेरी गाड़ी पर पथराव किया। #BengalSupportsBJP pic.twitter.com/G882Ewhq9M
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) December 10, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला