आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला, निषेध : मनसे

Raj Thackeray

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी रात्री तोडफोड केली. या घटनेवरून अनेकांनी संताप व्यक्त केला. मनसेनेही या घटनेचा निषेध केला आहे. राजगृहावरील हल्ला हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला, हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला आहे. त्यामुळे ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे- अशा शब्दांत मनसेने राजगृहावरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला आहे.

तसेच, सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं, असे मनसेने म्हटले आहे. राजगृहावरील हल्ल्याच्या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची दखल घेऊन या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER