मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई, दोघांना अटक

Mansukh Hiren

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) संशयास्पद मृत्यूप्रकरणी एटीएसच्या हातात मोठे धागेदोरे सापडले आहे. एटीएसने मोठी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येत या दोघांचा सहभाग असल्याचा दावा एटीएस करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हिरेन हत्येप्रकरणात एटीएसने (ATS)पहिल्यांदाच अटक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसुख हिरेनप्रकरण कालच एनआयएकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर आज एटीएसने या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचा हिरेन मृत्यूप्रकरणात हात असल्याचं सांगितलं जात आहे. आता या दोघांना एनआयएकडे सोपवले जाणार येणार आहे. या दोघांची नावे अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आली नाहीत. परंतु या दोन जणांना अटक केल्यानंतर हिरेन प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, हिरेनप्रकरणी एटीएसने आतापर्यंत २५ लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातून बरेच धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या टीमने 2 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना दुपारी कोर्टात हजर केलं. त्यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींची ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी शनिवारी एटीएसने सचिन वाझे यांचीही कोठडी मागितली होती. त्यावर कोर्टाने म्हटलंय की, वाझेची कोठडी २५ मार्चनंतर मिळेल.

मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने एक बुकी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. नरेश धरे असं अटक करण्यात आलेल्या बुकीचं नाव आहे. तर विनायक शिंदे हा मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल असलेल्या आरोपीला अटक केली आहे. विनायक शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील दोषी आहे. तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER