घुसखोर बांगलादेशींना ओळखपत्र देणारी टोळी एटीएसने (ATS) पकडली

ATS

मुंबई : घुसखोर बांगलादेशींना भारताचे ओळखपत्रं बनवून देणारी टोळी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथका (एटीएस)ने पकडली. आठ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध सरकारी कार्यालयांचे बनावट रबराचे शिक्के, बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड जप्त केलेत.

या प्रकरणात अक्रम शेख, मोहम्मद रफीक शेख, अविन केदारे, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल खैर समसुलहक शेख, अबुल हाशम ऊर्फ म्हामून काशम शेख, इद्रिस मोहम्मद शेख, नितीन राजाराम निकम या आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे मोहम्मद रफीक, मोहम्मद इद्रीस, अवीन केदारे, नितीन निकम आठ जणांनी बनावट कादपत्रांच्या सहाय्याने सुमारे ८५ बांगलादेशी घुसखोरांना व अनेक भारतीयांना देखील बनावट कागदपत्र्यांच्या आधारे पासपोर्ट मिळवून दिले आहेत. अक्रम शेख, सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुल शेख, अबुल हाशम. अशा एकूण ४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER