विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक; महाराष्ट्र एटीएसची कामगिरी

ATS 2 arrested-who-involved-with-vikas-dube-in-kanpur-encounter

मुंबई : उत्तरप्रदेशातील आठ पोलीस हत्याकांडातील दोन आरोपींना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही विकास दुबेचे साथीदार होते. दरम्यान, या हत्याकांडातील आणखी किमान १० आरोपी फरार असून उत्तरप्रदेश पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

विकास दुबेचे काल एन्काउंटर केल्यानंतर पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोधात होते. त्यामुळे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (महाराष्ट्र एटीएस) उत्तरप्रदेश पोलिसांना सहकार्य केले असून त्यांनीच या दोन आरोपींचा छडा लावला आहे. आज पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत विकास दुबेसह टोळीतील सहा गुंडांना एन्काउंटरमध्ये मारण्यात आले आहे. आज पकडण्यात आलेल्या आरोपींची अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी आणि सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी अशी नावं आहेत.

ठाण्यातून पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी पोलिसांनी सांगितले की, ‘विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता त्याच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात आठ पोलिसांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडातील अनेक आरोपी फरार असून त्यातील एक आरोपी ठाण्यात लपला असल्याची खात्रीशीर माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता. या सापळ्यात अरविंद ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी हा आरोपी अलगद अडकला. त्याला व त्याचा वाहनचालक सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी या दोघांना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. याबाबत उत्तरप्रदेश पोलिसांना कळवण्यात आले आहे, असे विक्रम देशमाने यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER