महिलांवरील अत्याचार : फक्त बैठका न घेता प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल फोर्स स्थापन करा; पंकजा मुंडे यांची मागणी

Pankaja Munde

बीड : तरुणीवर अॅसिड हल्ला करुन जिवंत जाळल्याची घटना बीडमध्ये घडली. यावर संताप व्यक्त करताना भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्यात – यासाठी फक्त बैठका न घेता, माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे.

बीडमध्ये (Beed) तरुणीवर अॅसिड हल्ला (Acid Attack) करुन नंतर जिवंत जाळण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली. यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला. गृहमंत्र्यांनी तात्काळ यात लक्ष घातल पाहिजे अशी मागणी केली.

त्या म्हणालात – महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातल पाहिजे. याबाबत फक्त बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा दिली पाहिजे.

दिवाळीच्या (Diwali) दिवशी अस काही बोलाव लागणे दुर्दैवी आहे, अशी खंत व्यक्त करून पंकजा म्हणालात – यासंबंधी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि बीडच्या पोलीस महासंचालकांशी बोलणार आहे.

घटना

दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणातील आरोपी व पीडित तरुणी पुण्यात सोबत ( लिव्ह इन रिलेशनशिप ) राहत होते अशी माहिती आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्याशेजारी २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळली. शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. १३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला नेऊन तिच्यावर अ‍ॅसिड टाकले आणि नतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

नंतर आरोपी फरार झाला. युवती अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के टक्के भाजली होती. सुमारे १२ तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले. पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER