ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा : गीताला रौप्यपदक, तुलसी आणि उन्नतीला कांस्यपदक

UNNATI_CHILKEWAR__GEETA_CHACHERKAR____TULSI_COUDHARI

नागपूर : अलवर, राजस्थान येथे आजपासून सुरु झालेल्या ३१ वी वेस्ट झोन कनिष्ठ गट ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०१९ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एक रौप्यपदक व दोन कांस्य पदक पटकावले.

महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत नागपूरच्या २० वर्षाखालील मुलीचे वयोगटात गीता चाचेरकरने ५००० मीटर दौड स्पर्धेत दुसऱ्या स्थानी राहून रौप्यपदक प्राप्त केले. गीताला स्पर्धा पूर्ण करण्यास २०.४९.३७ सेकंदाची वेळ घेतली. ती लेमदेव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून वनदेव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे.

उन्नती चिल्केवारने लांबउडी स्पर्धेत ४.९८ मीटर ची झेप घेत तृतीय स्थानासह कास्यपदक पटकाविले. प्रथम स्थान महाराष्ट्र संघातील तनिष्का ने ५.५० मीटरची झेप घेतली तर दुसऱ्या स्थानावर मध्यप्रदेश ची मार्टिना इलीसियुस राहिली. उन्नती प्रो-हेल्थ फौंडेशनची खेळाडू असून गौरव मिरासे यांचे मार्गदर्शनाखाली सराव करते. १६ वर्षाखालील मुलीच्या वयोगटात तुलसी चौधरीने ३००० मीटर चालणेच्या स्पर्धेत १८.५८.५३ सेकंदासह कास्यपदक प्राप्त केले, ३००० मीटर चालणे स्पर्धेत गुजरातच्या मानसी व हरपालं सिंघ अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थान प्राप्त केले, तुलसी जय ऍथलेटिक्स क्लबची खेळाडू असून सुनील कापगते याचे मार्गदर्शनाखाली सराव करते. अशी माहिती जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली.

जिल्हा संघटनेचे आजीवन अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी आणि नागपूर महानगर पालिकेचे माजी क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी खेळाडूंना शुभेछ्या दिल्या आहेत. याशिवाय एल. आर. मालवीय, एस.जे. अंथोनी, डॉ. धनंजय वेळूकर, उमेश नायडू, गुरुदेव नगराळे, रामचंद्र वाणी, शेखर सूर्यवंशी, अर्चना कोट्टेवार, प्रा. बंटी यादव, डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. अविनाश सहारे, जितेंद्र घोरदडेकर, हरेंद्र ठाकरे, मंगेश पौनीकर, अमित ठाकूर, चंद्रभान कोलते, ब्रिजमोहन सिंघ रावत, राहुल कालबांधे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

ही बातमी पण वाचा : विजेतेपदांची तिहेरी ‘टाय’ फेडरर, जोको व राफा बरोबरीत