अटलजींचा पुतळा उभरणारच; भाजपाने महाविकास आघाडीला ठणकावले

Atul Bhatkhalkar

मुंबई : कांदिवली पूर्व येथील क्रीडा प्राधिकरणाच्या क्रीडा संकुलाचे नामांतर व अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाच्या    समारंभाला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने विरोध केल्याचे वृत्त आहे. यावर भाजपा (BJP) मुंबईचे प्रभारी व कांदिवली पूर्वचे आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी “हा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करीत असून आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा आम्हाला तुरुंगात टाकले तरीही श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारणाच. हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे खुले आव्हान महाविकास आघाडी सरकारला दिले.

अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या व त्यांचा पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडी सरकारने विरोध करण्यामागे राजकारण असल्याचा आरोप केला जात आहे. या कार्यक्रमाला हजर राहू नका, असे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना कळवण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर व भाजपाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर भातखळकर यांनी, दाऊद इब्राहिम, झाकीर नाईक यांसारखे आतंकवादी व देशद्रोही आपलेसे वाटणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आयुष्यभर राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या अटलजींच्या पुतळ्याबद्दल विरोध करणे स्वाभाविकच आहे, असा टोमणा मारला.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडी सरकारने पुढील तीन महिन्यांत  रीतसर परवानगी दिली नाही तर भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते ‘कारसेवे’च्या माध्यमातून श्रद्धेय अटलजींचा पुतळा त्या ठिकाणी उभारतील, असा इशारा आ. अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER