१३ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

DR .Balsaheb Vikhe Patil & PM Modi

अहमदनगर : शेती, सहकार, पाणी आणि शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे लोकनेते दिवंगत पद्मभूषण  डॉ. बाळासाहेब विखे पाटील (Dr. Balasaheb Vikhe) यांनी आपल्या संपूर्ण राजकीय, सामाजिक वाटचालीवर शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन येत्या १३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

याबाबतची माहिती माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. पद्मभूषण  डॉ. बाळासाहेब विखे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या वाटचालीवर ‘देह वेचावा कारणी’ हे आत्मचरित्र शब्दबद्ध केले. देशातील आणि राज्यातील राजकीय, सामाजिक घटनांचा वेध या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांनी घेतला आहे.

पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांचे हे आत्मचरित्र नव्या पिढीसाठी ऐतिहासिक दस्तऐवज ठरावा असेच आहे. ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याच हस्ते व्हावे, अशी इच्छा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER