मुंबईत पोहचताच कंगना सिद्धिविनायकाच्या चरणी; मंदिराबाहेर येताच दिली ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा

Kangana-Siddhivinayak

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला (Siddhivinayak Mandir) भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. यावेळी तिच्यासोबत बहीण रंगोली, भाऊ आणि वहिनी होती .

मंदिराबाहेर येताच कंगनाने ‘जय महाराष्ट्र’ (Jai Maharashtra)घोषणा दिली. जय महाराष्ट्र जय सिद्धिविनायक म्हणत कंगनाने मंदिराबाहेर उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने मुंबईत राहण्यासाठी आपल्याला कोणाच्या परवानगीची गरज नाही म्हणत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. अजून कोणाकडे मी परवानगी मागितलेली नाही, असे कंगनाने सांगितले.

ही बातमी पण वाचा : कंगना रनौत परतली मुंबईला 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER