केंद्रिय स्तरावर राहुल गांधी इन अॅक्शन तर राज्यात अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस इनकमिंगवर जोर

Rahul Gandhi - Ashok Chavan

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभेचे उमेदवार राहिलेले मारोती कवळे गुरुजी यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री, माजी मुख्यमंत्री कॉंग3ेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या आशा पुन्हा वाढल्या आहेत. नांदेडमध्ये (Nanded) आणखी काही दिग्गज नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात मला चांगल्या व्यक्ती हव्या आहेत, असं वक्तव्य चव्हाणांनी केलं.

मारोती कवळे हे उमरी तालुक्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या कवळे गुरुजींच्या काँग्रेस प्रवेशाने नायगांव विधानसभा मतदारसंघातील चित्रच बदलणार आहे. कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. पतपेढीच्या माध्यमांतून कवळे गुरुजींनी हजारो शेतकऱ्यांना आर्थिक हाथभर लावत पायावर उभे केलंय. दूध, गुळाच्या व्यवसायात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी जोडलेलं आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक असलेले कवळे गुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

आता ते कॉंग्रेसमध्ये आले आहेत. त्यांच्या प्रवेशाने चव्हाणांनी पुन्हा आपल्याला पक्षात चांगले नेते आवश्यक असल्याचे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, केंद्रिय सत्रावर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) एक्शनमोडमध्ये आले असून ते भाजवर शरसंधान साधत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. जनतेला संबोधित करताना त्यांनी विविध मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शनिवारी राहुल यांनी तिरुपूरमधील जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आरएसएसवर टीकास्त्र सो़डलं आहे. आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.

तसेच, नागपूरचा निकरवाला तामिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही, आता इथले युवकच तामिळनाडूचं भविष्य ठरवतील, त्यांच्या मदतीला मी आलोय, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल गांधींनी जबरी टीका केलीय. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

तर दुसरीकडे राज्यातही कॉंग्रेस नेत्यांनी पक्षमजबुती आणि पक्षवाढीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. अशोक चव्हाणांचे नांदेडमधील कार्य याची साक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER