किमान पूजाच्या आई-वडिलांचं ऐकायला हवं : नाना पटोले

नवी दिल्ली : पूजा चव्हाण (Pooja Chauhan) मृत्युप्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने (BJP) गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. या भूमिकेवर काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टीका केली आहे. “या प्रकरणात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल येईल, त्या दिवशी काँग्रेस भूमिका स्पष्ट करणार.

पूजा चव्हाणचे आई-वडील जे म्हणत आहेत, त्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आई-वडील म्हणतात बदनामी थांबवा, मग भाजपा का उतावीळपणा करत आहे?” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. यापूर्वी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणात भाजपने असेच केले. त्यावेळी त्यांनी सीबीआय चौकशी का केली नाही? त्यात भाजपाचे लोक सहभागी होते, म्हणून त्यांनी चौकशी केली नाही, असा दावा पटोले यांनी केला.

राजीनाम्यावरून पटोले यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. फडणवीस हे मोदींचे शिष्य आहेत. ते काहीही करू शकतात, असे ते म्हणाले. परंतु, पूजाच्या आई-वडिलांचे म्हणणे काय, ते ऐकून  घ्यायला पाहिजे, असे आवाहनही पटोले यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER