किमान प्रवक्ता केले असते तर… जाधव यांची भाजपाच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका

Bhaskar Jadhav.jpg

गुहागर : पक्षाने  (शिवसेने )  मला किमान प्रवक्ता केले असते तर भाजपला तोंड वर काढू दिले नसते, अशी बढाई मारत शिवसेनेचे (Shivsena) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपावर (BJP) टीका करण्याच्या निमित्ताने पक्षाबद्दलची खदखद व्यक्त केली.

भास्कर जाधव म्हणाले, ज्यांच्याशी मैत्री करायची त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपाची परंपरा जुनी आहे. विधानसभा निवडणुकीत युती असूनही भाजपाने आपल्याला कसा दगा दिला, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्रात आज भाजपा केवळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनामुळेच आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, बिहारमध्ये जाऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही फक्त नरेंद्र मोदी यांना मानतो.

दुसऱ्या  कोणाला मानत नाही. पण, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नरेंद्र मोदी राजकारणात पुढे आलेत, हे विसरून चालणार नाही. आज अयोध्येत राम मंदिराची वीट उभारली जाणार असेल तर पहिली वीट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने लावली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. ज्या वेळी बाबरीचा मुद्दा समोर आला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचं  नाव सर्वांत पुढे होतं हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घायला हवं, असे ते म्हणाले.

भाजपाची मंडळी अर्णव  गोस्वामी यांना पाठिंबा देत आहे. कोण अर्णव  गोस्वामी, कोण तो सुशांत सिंग राजपूत ? यांचं  महाराष्ट्रात योगदान काय? असे म्हणत त्यांनी अर्णव  गोस्वामीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपावर भास्कर जाधव यांनी टीका केली. ज्या माणसाने एका मराठी माणसाचे कष्टाचे पैसे थकवत त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्याचा तसा लेखी पुरावा आहे. असे  असतानाही भाजपाची मंडळी दिल्लीतल्या नेत्यांना खूश करायला अर्णवसाठी रस्त्यावर उतरली, हा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी लोकांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER