सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटची चाहूल

Kolhapur hot-heat

कोल्हापूर : अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, सरासरी पाच अंशांने वाढलेला पारा, कोरोना संसर्गाचा (Corona Virus) फैलाव, असे आरोग्यावर परिणाम करणाऱ्या वातावण सध्या जिल्ह्यात आहे. यंदा सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटची चाहुल जाणवू लागली आहे. दुपारी कडक उन्हाचे चटके, सायंकाळी पावसाळी वातावरण, रात्री हवेत काहीसा गारठा असे वातावरण कोल्हापूकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

मे-जून, सप्टेंबर-ऑक्टोबर व जानेवारी-फेब्रुवारी ही साधारण ऋतू संक्रमणाची कालावधी मानली जाते. या काळात वातावरणात मोठे बदल होत असतात. पावसाळा संपून हवेत गारठा वाढतो. कडक उन्हाळा संपून हवेत कमालीची आर्दता वाढण्यास सुरूवात होते. तर आर्दता कमी होवून वातावरणात रुष्कपणा वाढीस लागतो. याकाळास ऋतूसंक्रमन म्हणतात. सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिट सारखे वातावरण जाणवू लागली आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण आणि दिवसा वातावरणात वाढलेला पारा नागरिकांना हैराण करीत आहे. आशा विचित्र वातावरणापासून बचाव हाच उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावत आहेत. दिवसा कडक ऊन रात्रीचे थंड वातावरण असा वातावरणात विरोधाभास दिसून येत आहे. दिवसभर प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या कोल्हापूरकरांना रात्री पडणाऱ्या थंडीने दिलासा मिळत असला तरी त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. ताप,सर्दी, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढत आहेत. सध्या कोरोना संसर्ग वाढीचा दर टिपेला पोहचला आहे. अशावेळी बदललेल्या या वातावरणात स्वत:सह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे, आजारांची लक्षणं दिसताच दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय उपचार घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER