येत्या रामनवमीला अयोध्येत राम मंदिर निर्मितीचा शुभारंभ होण्याची शक्यता

Nirpendra Mishra

अयोध्या : येत्या राम नवमीलाच मंदिर निर्मितीचा शुभारंभ केला जाईल असे बोलले जात आहे. राम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी आज अयोध्येला भेट दिली. मिश्र यांच्या भेटीनंतर मंदिर निर्मितीवरील चर्चेने जोर पकडला आहे.

दरम्यान, मंदिर निर्मितीचे टप्पे कोणते यावर सध्या चर्चा सुरू असून त्या दिशेने अभ्यास केला जात आहे अशी माहिती ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सांगितले. शनिवारी सदस्यांसोबत मिश्र यांनी दोन तास मंदिर परिसरात घालवून विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरु करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

रामनवमीच्या उत्सवासाठी अयोध्येत १५ ते २० लाख लोक येत असतात. या भाविकांनी दर्शन घेऊन, पूजन करून आपापल्या घरी सुखरूप जावे असे आम्हाला वाटते आणि भाविकांची सोय पाहणे हे आपले पहिले कर्तव्यच असल्याचे राय यांनी सांगितले.

मंदिर निर्मितीचा कोणता टप्पा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल यावर विचार केला जात आहे. त्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ लोक त्या कामाची आखणी करतील. या नंतर हे काम सुरू करण्यासाठी पूजेचा आरंभ केव्हा करावा हे ठरवले जाईल, असेही राय म्हणाले.

हे महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी एक-एक पाऊस कसे टाकायचे, आणखी कोणती कामे करावी लागणार हे अजून निश्चित केले जात आहे, असे महामंत्री चंपत राय यांनी सांगितले. राम जन्मभूमी परिसरात संपूर्ण व्यवस्था करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत रामलल्लाला फायबरच्या मंदिरात हलवण्याला प्राथमिकता देण्याचे ठरवण्यात आले आहे असे ट्रस्टमधील सूत्रांनी सांगितले.