प्रसारमाध्यमांशी बोलण्यावर बंदी ; वारिस पठाणवर ओवीसींची कारवाई

aswadindin owaisi action on Waris Pathan

नवी दिल्ली : १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “ असे धार्मिक तेढ निर्माण वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी आमदार वारिस पठाण यांना एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यावर बंदी टाकली आहे.

वारिस पठाण हे एआयएमआयएम ( ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन ) पक्षाचे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार आहेत. औरंगाबादचे खासदार खासदार इम्तियाज जलील म्हणाले की पक्ष याबाबत वारीस पठाण यांना स्पष्टीकरण मागणार आहे. आता पक्ष परवानगी देईपर्यंत वारिस पठाण सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

गुलबर्गा येथील जाहीर सभेतील वारिस पठाण यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेने वारिस पठाण यांच्यावर टीका केली आहे. पठाण यांनी या वक्तव्याबाबत माफी मागण्यास नकार दिला आहे. मी जे काही बोललो ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असे वारिस पठाण म्हणाले. जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. “ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एक अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या वक्तव्यात मग्रुरी आहे. माज आहे. वारिस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून म्हणतात, आपण “१५ कोटी आहोत, पण १०० ला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट!” ‘१००ला भारी’ म्हणजे नेमके कोणाला हे १५ भारी पडणार? हिंदूंनाच ना! हिंदुस्थानात राहून हिंदूंनाच धमकी देतोय हा उपटसुंभ!

जावेद अख्तर यांची टीका

या देशात ब्रिटिशांनी १५० वर्ष सत्ता केली.पण देशातील ऐक्याला त्यामुळे फरक पडला नाही. मुस्लीम बांधव देशात एकतेच्या भावनेने सामावले गेले आहेत. असे असताना या १५ कोटी मुस्लिमांचा ठेका घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?असा जाब जावेद अख्तर यांनी उपस्थित केला. तसेच, तुम्ही पंधरा कोटीच रहाल, कधी सोळा कोटी होणार नाही, असे म्हणत अख्तर यांनी वारिस पठाण हे वेडे आहेत. आजही जिनांच्या विचारसरणीत ते वावरत आहेत, असा टोमणा मारला.

भाजपा

जे पठाण पाच लाखाहून कमी मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत, त्यांनी स्वतला १५ कोटी नागरिकांचे प्रतिनिधी समजून बोलण्याची गरज नाही, असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले.

भाजपाने औरंगाबादेत जाळला वारिस पठाण यांचा पुतळा