व्हॉटस् अॅपने ‘स्टेटस’ मधून केले आश्वस्त

WhatsApp

नवी दिल्ली : व्हॉटस् अॅप (WhatsApp) नव्या पॉलिसीमुळे विरोध होत आहे. व्हॉटस् अॅपने या पॉलिसविषयी असलेल्या भूमिकेबाबत व्हॉटस् अॅप स्टेटसमधूनच स्पष्टीकरण दिले. व्हॉटस् अॅप वापरकत्त्यांना व्हॉटस् अॅपचे हे स्टेटस त्यांच्या स्मार्टफोनमध्ये दिसले. याद्वारे व्हॉटस् अॅपने युजर्सना दिलासा दिला.

व्हॉटस् अॅपच्या नव्या पॉलिसीनुसार व्हॉटस् अॅप वापरणाऱ्या सर्व वापरकर्त्यांची माहिती यापुढे व्हॉटस् अॅपची पेरेंट कंपनी असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम या कंपन्यांशी शेअर करण्यात येणार होती. ही पॉलिसी फेब्रुवारीपासून लागू होणार होती; पण वापरकर्त्यांचा विरोध पाहून ही पॉलिसी भूमिका स्टेटसमधून मांडली. व्हॉटस् अॅप लागू करण्याची तारीख कंपनीने पुढे वापरकर्त्यांना रविवारी आपल्या फोनमध्ये ढकलून ती मे महिन्यात निश्चित केली.

व्हॉटस् अॅपच्या या स्टेटसमध्ये चार इमेज शेअर केल्या आहेत. पहिल्या इमेजमध्ये व्हॉटस् अॅप ग्राहकांची माहिती फेसबुकशी शेअर करत नसल्याचे म्हटले होते. -दुसऱ्या इमेजमध्ये वापरकर्त्यांचे लोकेशन व्हॉटस् अॅप शेअर करत नसल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या इमेजमध्ये म्हटले आहे की, व्हॉटस् अॅप तुम्ही केलेले चॅट वाचू किंवा ऐकू शकत नाही, तर चौथ्या इमेजमध्ये व्हॉटस् अॅप कंपनी वापरकर्त्यांच्या खासगीपणाचा आदर राखत असून, वापरकर्त्याच्या गोपनीयतेसाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER