शरद पवारांकडून तमाशा कलावंतांना मोठे आश्वासन

Sharad pawar

मुंबई : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाले होते . राज्यातील बंद करण्यात आलेली लोकनाट्य कलाकेंद्र काही नियम आणि अटी घालून सुरू करण्यास राज्य सरकार परवानगी देईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले, अशी माहिती राज्य थिएटर मालक संघाचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव (Ashok Jadhav) यांनी दिली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटकातमाशा कलावंतांनाही बसला आहे . त्यामुळे सर्व कलावंतांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे .

बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट कोसळलेल्या या तमाशा कलावंतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेल्फेअर फंडातून शरद पवार यांनी मदत दिली. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी डॉ. अशोक जाधव, अभयकुमार तेरदाळे आणि जयश्री जाधव यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

राज्यात ७० लोककला केंद्र असून त्यात जवळपास १४ हजार कलावंत काम करतात. हे केंद्र बंद असल्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे इतर उद्योगांप्रमाणे लोककलावंतांनाही अटी आणि नियम घालून परवानगी द्यावी आणि लॉकडाऊननंतर सरकारने लावणी महोत्सव भरवावेत, अशीही मागणी जाधव यांनी यावेळी केली.

ही बातमी पण वाचा : बंडखोरी टाळण्यासाठी नाराज ६३ आमदारांना महामंडळाची लॉटरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER