
कोल्हापूर : कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी मोठी कारवाई केली. तब्बल वीस लाखा रुपयांची लाच स्वीकारताना सहायक नगररचना अधिकारी गणेश हनुमंत माने सापडला.
माने यांनी ४५ लाख रुपयांची मागणी केली होती.
माने यांच्या विरोधात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २२ जानेवारी रोजी तक्रार प्राप्त झाली होती. एका संस्थेच्या ११ एकर जमिनीचे मूल्याकंनासाठी लाच स्वीकारताना ही कारवाई झाली आहे. यासंबंधी अधिक माहिती अशी की, एका संस्थेच्या ११ एकर जमीनीच्या मूल्यांकनासाठी चेअरमन यांनी रितसर अर्ज केला होता. या कामासाठी ते सहजिल्हा निबंधक कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी त्यांना सहाय्यक नगररचना अधिकारी गणेश माने भेटले. त्यांनी या कामासाठी ४५ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या तक्रारीची शहानिशा केली आणि सापळा लावला. शुक्रवारी गणेश माने हे वीस लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला