वसई-विरार महापालिकेचे सहायक आयुक्त दोन दिवसांपासून बेपत्ता

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेचे सहायक आयुक्त (Vasai-Virar Municipal Corporation) प्रेमसिंग जाधव (Premsingh Jadhav) मागील दोन दिवसांपासून बेपत्ता (missing) झाले आहेत. महानगरपालिकेत मागच्या एक वर्षापासून कोरोना रुग्णांची विल्हेवाट लावण्याचा प्रभारी पदभार प्रेमसिंग जाधव यांच्याकडे होता. ते बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सहायक आयुक्तपदाचा कारभार सांभाळताना जाधव यांनी वसई-विरार शहरातील अनेक अनधिकृत बांधकामेही जमीनदोस्त केलेली आहेत. २ जून रोजी कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र ते घरी परतलेच नाहीत.

याबाबत विरार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांकडून दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग जाधव यांचे शेवटचे लोकेशन विरार रेल्वेस्थानकातले असल्याचे समजले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button