विधानसभानिहाय मतमोजणी केंद्रे जाहीर

vidhansabha.png 2

औरंगाबाद :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी मतदान दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होत आहे. तर मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी केंद्रे जाहीर करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे.

ही बातमी पण वाचा : कलापथकाद्वारे जिल्ह्यात मतदान करण्यासाठी जनजागृतीला सुरूवात

सिल्लोड विधानसभा मतदार संघांची मतमोजणी शासकीय टेक्न‍िकल शाळा, सिल्लोड, कन्नड येथे शिवाजी महाविद्यालय, इंडोअर स्टेडिअम, फुलंब्री विधानसभा क्षेत्रामध्ये सिपेट इमारत, विमानतळाजवळ, औरंगाबाद, औरंगाबाद मध्यचे शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपुरा, औरंगाबाद पश्चिममध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, औरंगाबाद, औरंगाबाद पूर्वचे होमगार्ड कार्यालय (औरंगाबाद शहर), एन 12, हडको, औरंगाबाद, पैठण विधानसभा क्षेत्रचे प्रशासकीय इमारत, संतपीठ, उद्यान रस्ता, पैठण, गंगापूर विधानसभा क्षेत्राचे मुक्तानंद महाविद्यालय, इंडोअर स्टेडीयम, गंगापूर आणि वैजापूर येथे विनायकराव पाटी महाविद्यालय, सभागृह क्रमांक 1, येवला रस्ता, वैजापूर याठिकाणी मतमोजणी होणार आहे.