विधानसभा अध्यक्ष : पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्याला मिळणार संधी?

Sangram Thopate

नवी दिल्ली : नाना पटोले (Nana Patole) यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच (Congress) पद राहणार, हे निश्चित मानले जाते आहे. काँग्रेसने अजून यासाठी कोणाच्याही नावाची घोषणा केली नसली तरी हे पद पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावान आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांना मिळेल, अशी चर्चा आहे.

राज्यात सत्तेत आल्यानंतर पुणे जिल्ह्यात काँग्रेसकडून मंत्रिपद देण्यात आले नाही. संग्राम थोपटे हे गेले अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा आणि पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असतानाही जिल्ह्यात थोपटे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावत ठेवला आहे. अशा निष्ठावंताला न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होणार आहे, अशी माहिती आहे.

मंत्रिपदासाठी थोपटेंचे दबावतंत्र

राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदे जाहीर करण्यात आली. या यादीत संग्राम थोपटे यांचे नाव न आल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यात मोठा गोंधळ घातला होता. थेट पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. त्यामुळे संग्राम थोपटे हे राज्यभरात चर्चेत आले. मात्र त्यावेळी थोपटे यांनी हात झटकत मला या तोडफोडीची माहिती नव्हती, असे म्हणून प्रकरण झटकले होते. मात्र, या सगळ्या प्रकारातून संग्राम थोपटे यांनी त्यांची नाराजी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून दिली होती, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER