विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची नागपूर येथील कोविड हॉस्पिटलला भेट

Nana Patole

नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो हॉस्पिटल (Meyo Hospital) येथील कोविड हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज तेथे भेट देऊन घेतली.

रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या व्हीआयपी व साधारण बेड्ची माहिती असलेला डॉशबोर्ड तसेच कॉम्प्युराईज्ड सिस्टिमची माहिती जाणून घेतली. रुग्णांची गैरसोय होणार नाही. गरीब व गरजू कोणीही रुग्ण उपचाराविना वंचित राहू नये याची दक्षता घेऊन रुग्णांना योग्य सेवा मिळाल्या पाहिजेत, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

मेयो हॉस्पिटल मधील कोविड हॉस्पिटल येथील पी.पी.ई. किट, पल्स ऑक्सिमीटर तसेच सिक्स मिनीट वाकींगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयातील औषधी विभाग व नवीन बेड्ची पाहणी केली.

यावेळी त्यांनी सुविधांची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सजल मिश्रा व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णास पाहता यावे यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कॉम्प्युटराईज्ड सुविधेची पाहणी करुन त्याबाबत माहिती विधानसभा अध्यक्षांनी घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER