
मुंबई : आजपासून राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरू झाले. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष्य वेधण्यासाठी आमदार रवी राणा ‘उद्धवा अजब तुझे सरकार, शेतकऱ्यांचे मरण, हेच राज्य सरकारचे धोरण’ असा मजकूर लिहिलेला पोषाख परिधान करून सभागृहात आलेत. यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आक्षेप घेतला.त्याना सभागृह सोडण्याचे आदेश दिले.
नाना पटोले यांनी राणा (Ravi Rana) यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिल्यानंतर राणा सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. नाना पटोले म्हणालेत, ‘रवी राणा यांची कृती योग्य नाही. अशा पद्धतीचा पोषाख परिधान करुन कोणी सभागृहात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गेटवर थांबवा.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला