विधानसभा अध्यक्ष नाना पटोले करोना पॉझेटिव्ह

Nana Patole

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाली. नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. “करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी करोना चाचणी केली; त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,” अशी माहिती नाना पटोले म्हणालेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असे त्यांनी सांगितले.

“गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये,” असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

“गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच करोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुनील केदार

मंत्री सुनील केदार यांना बरे वाटत नसल्याने काल त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. पॉझेटिव्ह आली. ते देखील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER