अधिवेशनाला दांडी मारू नका : उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीच्या आमदारांना आवाहन

CM Uddhav Thackeray

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दांडी मारू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना दिले आहे. सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहा असे आदेश त्यांनी दिले आहेत.

महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सरकार पडण्याची जी चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कुठल्याही स्थितीत हे सरकार पडणार नाही, हे आमदारांना सांगण्यात आले.

महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे मंगळवारी राज्यभर धरणे आंदोलन

सीएए आणि एनआरसीबाबत सरकारच्या अडीअडचणीच्या मुद्दावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली असून कुठल्याही स्थितीत सरकार पडणार नसल्याचे सर्व आमदारांना सांगण्यात आले असून सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.