भाजपच्या कृत्याची लाज वाटते : उद्धव ठाकरे

assembly session Uddhav Thackeray slams BJP

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना विरोधी पक्ष भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. कोविडची परिस्थिती आणि मदतकार्याविषयी बोलताना ते आक्रमक झाले. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कृत्याची लाज वाटते, असे संतापजनक वक्तव्य केले. कोविड काळात कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना व सुविधा पुरविण्याची आर्थिक गरज असताना महाराष्ट्राला मदत न करता दिल्लीला पैसे पाठविल्याबद्दल त्यांनी भाजप (BJP) नेत्यांवर टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यावेळी महाराष्ट्रातील जनतेसाठी कोरोना काळात उपाययोजना कराव्या लागल्या, सेवासुविधा देण्यासाठी अर्थसंकलन सुरू केले. मला लाज वाटते की, भाजपच्या आमदारांचा फंड महाराष्ट्रासाठी न येता दिल्लीकडे गेला. मुख्यमंत्री मदत निधी मला नको होती, महाराष्ट्रासाठी हवे होते. माझ्यासाठी, माझ्या मातापित्यांची आणि जनताजनार्दनाच्या आशीर्वादाची पुण्याई आहे. ज्यांनी महाराष्ट्रासाठी कोरोना काळात आर्थिक मदत केली, त्यांचे धन्यवाद आहे.”

केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडचा हिशेब कोण मांडणार?
“महाराष्ट्रात भाजप जी पोलखोल करत आहे, ती पोलखोल नाहीच. केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडचा हिशेब कोण मांडणार? कोण देणार? त्याचा हिशेब विचारायचा नाही का? ते उत्तर द्यायला बांधील नाहीत. कारण ते महान लोक आहेत. त्यांच्याकडचा फंड तुमच्या चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. वाटेल तितके आपटा, बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही.” असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

“एकतर कोणामध्ये प्रश्न विचारण्याची हिंमत नाही. जर विचारला, तर देशद्रोही ठरवले जाते. काय परिस्थिती आली आहे की, लोकांनाही आता कळायला लागले आहे की, प्रश्न विचारला की देशद्रोह. ही इथली लोकशाही आहे.” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER