अर्णब गोस्वामीविरोधात विधिमंडळाकडून दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस

Arnab Goswami - Vidhan Bhavan

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर विधिमंडळाने गोपनीयतेच्या अटीवर दिलेले कार्यवृत्त परवानगीशिवाय न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दोन वेळा विधिमंडळाचा हक्कभंग केल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

विधिमंडळाने पावसाळी अधिवेशनात अर्णब गोस्वामीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख आणि सरकारची विनाधार बदनामी केल्याच्या आरोपाखाली हक्कभंग नोटीस बजावली होती. या नोटीससोबत विधिमंडळाने अर्णब  गोस्वामी यांना माहितीसाठी त्या दिवशीचे कार्यवृत्तदेखील गोपनीयतेच्या अटी-शर्ती घालून दिल्या  होत्या. या अटी-शर्तींनुसार विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयीन अथवा इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरता येऊ नये, असं स्पष्ट करण्यात आलं होतं.

अर्णब  गोस्वामी यांनी पहिल्या हक्कभंगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवायच विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयात सादर केले. त्यामुळे अर्णब  गोस्वामी कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची दाट शक्यता आहे. विधिमंडळाने अर्णब  गोस्वामी यांची ही कृती विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे सांगत पुन्हा नोटीस बजावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER