मतदानासाठी कामगारांना सोमवारी भरपगारी सुट्टी

Assembly elections.jpg

कोल्हापूर :- विधानसभा मतदानादिवशी २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील कामगारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने शासन निर्णयाव्दारे सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी तसेच औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या , शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांनी त्यांच्या आस्थापनेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी , कामगार यांना मतदानादिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यां च्या पूर्व परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

सर्व मालकांनी तसेच व्यवस्थापनांनी वरीलप्रमाणे काटेकोरपणे अनुपालन रावे. मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरात वाढतोय इलेक्शन फिव्हर