परळीत भाऊ-बहिणीत सामना; शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची उमेदवारी जाहीर

Sharad Pawa-Dhananjay Munde-Pankaja Munde

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी इतर पक्षाच्या सर्वांत आधी मजल मारत विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत केवळ बीडच्या उमेदवारांचे नाव जाहीर केले आहेत.

ही बातमी पण वाचा:- मनसेही विधानसभेच्या रिंगणात, उमेदवारांची यादी ……

सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर शरद पवारांनी पहिली यादी जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर गेवराई- विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड- संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करू, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांनी उमेदवार जाहीर केल्याने आता बीड जिल्ह्यात रंगतदार लढती होणार आहेत. यात सर्वांत जास्त रंगतदार लढत मुंडे भाऊ – बहिणीत होणार हे निश्चित झाले आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात हा सामना रंगणार आहे. तर अन्य पक्षाच्या विद्यमान आमदारांना तिकीट मिळाल्यास नात्यागोत्यातच लढती होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.