मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’ प्रसारणावर बंदी

Assembly elections Exit poll ban on voting day

नवी दिल्ली : मतदानाच्या दिवशी म्हणजे, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल (मतदानोत्तर चाचण्यांचे कल) दाखवण्यास बंदी टाकली आहे.

२१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी यांसदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे की – २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवले जाऊ शकणार नाहीत. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागेल.