सेना-भाजप युतीला बंडखोरीचे ग्रहण ? ३० जागांवर विरोधकांना फायदा होण्याची शक्यता

Assembly elections bjp-sena-alliance-revolts.jpg

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप -शिवसेनेच्या महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवसापर्यंतही महायुतीने बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न केले . मात्र ते अपयशीच ठरले .

ही बातमी पण वाचा:- कोल्हापुरात बंडखोर फोडणार घाम

काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

महायुतीमधील या बंडखोरीचा आघाडीला तब्बल ३० जागांवर फायदा होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

यंदाच्या विधनसभा निवडणुकीत ५० मतदारसंघात तब्बल १४४ सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. जवळपास ३० जागांवर बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील ३० जागांवर आघाडीला फायदा आणि युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान इतर पक्षातून आलेल्याला उमेदारांना तिकिट मिळाल्यामुळेही पक्षातील नाराजी समोर आली. यामुळे काही इच्छुक नेत्यांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले. त्यात मुंबईतील तीन जागांचाही समावेश आहे.

मराठवाडा, पुणे, कोकण, सोलापूर आणि नाशिकमधून बंडखोरांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे .