बिहारमध्ये भाजप सुस्साट, सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज

Bihar Assembly elections

पाटणा : आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar Assembly elections) वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून, भाजपसाठी आनंदाची बातमी पुढे आली आहे. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांसह सरकार स्थापन करेल, असा अंदाज टाईम्स नाऊ-सी व्होटरनं वर्तवला आहे. विशेष म्हणजे यंदा भाजप त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा जिंकेल, अशी शक्यता आहे.

टाईम्स नाऊ-सी व्होटरनं बिहारमधील सर्व २४३ विधानसभासंघांमध्ये मतदारांचा कौल जाणून घेतला. यापैकी १६० जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज टाईम्स नाऊ-सी व्होटरच्या सर्वेक्षणात व्यक्त केला गेला आहे. बिहारमधील एनडीएचा विचार केल्यास सध्या संयुक्त जनता दल (जेडीयू) सर्वात मोठा पक्ष आहे. तर त्याखालोखाल सर्वाधिक आमदार भाजपचे आहे. मात्र यंदा भाजप ८५ जागा जिंकून जेडीयूला मागे टाकेल. तर जेडीयूला ७० जागा काबीज करता येतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER