भाजपची चौथी यादी जाहीर; तावडे, खडसे, मेहतांचा पत्ता कट, तर बावनकुळे वेटिंगवर

Eknath Khadse-Chandrashekhar Bawankule-Vinod Tawde-Prakash Mehta

मुंबई : भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता, या महत्त्वाच्या नेत्यांची नावं नाहीत. मात्र विद्यमान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघासाठी अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे एकप्रकारे वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा:– नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच जोरदार शक्तिप्रदर्शन

भाजपकडून नुकताच जाहीर झालेल्या चौथ्या यादीत मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, तुमसरमधून प्रदीप पडोले, नाशिक पूर्वमधून राहुल धिकाले, बोरिवलीमधून सुनील राणे, घाटकोपर पूर्वमधून शहा, आणि कुलाबा मतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.