हदगांव : एकवेळेस सेवा करण्याची संधी द्या; बाबुराव कदम यांचे भावनिक आवाहन 

Baburao Kadam

हदगाव/ तालुका प्रतिनिधी: हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून बरडशेवाळा , पळसा, मनाठा परीसरात ग्रामीण भागासह मतदार संघातील कामे करण्यासाठी मला एक वेळ संधी द्यावी असे अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांनी बामणी फाटा येथे 15 रोजी दुपारी झालेल्या प्रचार सभेत आवाहन केले.

हदगाव हिमायतनगर तालुक्यातील चौरंगी लढत आहे.शिवसेनेकडुन विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टिकर,तर काँग्रेस कडुन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर रिंगणात आहेत तर वंचित कडुन डॉ भारती तर शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असल्याने मतदार संघात चौरंगी लढत होत आहे.बाबुराव कदम यांनी शिवसेनेमध्ये पंचवीस वर्षे एकनिष्ठ राहुन जनतेचे केलेले काम व संपर्क व स्वभाव लक्षात घेऊन हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या ईतिहासात प्रथमच पहिल्यांदा उमेदवारावर सहानुभूती दाखवत बाबुराव कदम यांच्या बैठकीला सभेला मतदारांकडून होईल ते सहकार्य देतांनाचे चित्र पहावयास मिळत आहे.

15 रोजी दुपारी बामणी फाटा येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बाबुराव कदम यांनी बोलताना म्हणाले, मी पदावर असताना आणि नसतानाही गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेमध्ये एकनिष्ठ राहुन जनतेचे होईल ते काम केले नेहमी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला.माणसाला काम करण्याची इच्छा पाहिजे ती माझ्या मध्ये आहे . मी पदावर नसताना केलेल्या कामाची सहानुभूती आपण दिल्याने पक्षाने धनशक्तीला उमेदवारी दिली तरी आपण केलेले प्रेमामुळेच आपल्या जनशक्तीच्या आधारावर हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघ संघातील असलेले काम पूर्ण करण्यासाठी मतदान रुपी आशिर्वाद घेऊन मला एक वेळ संधी देऊन मतदार संघाची सेवा करण्याची संधी द्यावी असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.