
पुणे : गाडीला धक्का लागला म्हणून सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी (mahesh-manjrekar) एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार समोर आला आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला आपल्या गाडीचा पाठीमागून धक्का लागल्यावर मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांकडे दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महार्गावर ही घटना घडली आहे. महेश मांजरेकर यांच्या गाडीला मागून येणाऱ्या मारुती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीनं धडक दिली. त्यानंतर मांजरेकर यांनी खाली उतरुन गाडीची पाहणी केली. त्यावेळी झालेल्या वादात मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारल्याचा आरोप कैलास सातपुते यांनी केला आहे.
आपल्या पुढे गाडी चालवणाऱ्या मांजरेकर यांनी अचानक ब्रेक मारला. त्यामुळे आपली कार त्यांच्या कारला मागून धडकली. त्यानंतर मांजरेकर यांनी ‘तू गाडी पिऊन गाडी चालवतो का’ असं म्हणत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मांजरेकर यांनी दारु पिऊन चापट मारली असं तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला