मनसुख हिरेन यांची हत्याच; एटीएस प्रमुखांकडून खुलासा

Mansukh Hiren - Shivdeep Lande - Maharastra Today

मुंबई : मनसुख हिरेन (Manshuk Hiren) मृत्युप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तपासाअंती एटीएसने या प्रकरणाचे असलेले गूढ उकलले. एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन खूनप्रकरणातील गूढ उकलले आहे. मी माझ्या एटीएस पोलीस दलाच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून सलाम करतो, ज्यांनी या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून पूर्ण पद्धतीने न्याय दिला आहे. माझ्या पोलीस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वांत जटिल घटना होती, असे शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER