बंगालमध्ये भाजपा नेत्याची हत्या; राज्यपालांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावले समन्स

Manish Shukla - Jagdeep Dhankar

कोलकाता : भाजपाच्या (BJP) जिल्हा समितीचे सदस्य व माजी नगरसेवक मनिष शुक्ला (Manish Shukla) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी रविवारी सायंकाळी टीटागढ ( पश्चिम बंगाल ) येथे गोळ्या घालून हत्या केली. या घटनेची दखल घेत बंगालचे राज्यपाल जयदीप धंकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व पोलीस महासंचालकांना समन्स पाठवले आहे.

भाजपाच्या २४ उत्तर परगना जिल्हा समितीचे सदस्य मनिष शुक्ला पक्ष कार्यालयात जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर टीटागढ पोलीस ठाण्यासमोर गोळ्या झाडल्या ! या घटनेची गंभीर दखल घेत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धंकर (Jagdeep Dhankhar) यांनी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावलं.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याचे गृह सचिव, अतिरिक्त गृहसचिव कृष्णा द्विवेदी व पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक विरेंद्र यांना आज उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या घटनेवरून भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर – हा राजकीय दहशतवाद आहे, अशी टीका केली आहे. ते म्हणाले – भाजपाचे युवा नेते, वकील आणि माजी नगरसेवक मनिष शुक्ला यांची हत्या निंदनीय आहे. हे तृणमूल काँग्रेसच्या सत्तेखाली असलेल्या पश्चिम बंगालमधील रक्तरंजित राजकारणाचे उदाहरण आहे. या राज्य सरकारकडून न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकते का? हा तृणमूलचा राजकीय दहशतवाद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER