आसाम : काँग्रेसच्या माजी मंत्री अजंता निओग लवकरच करणार भाजपात प्रवेश

BJP & Ajanta Neog

गुवाहटी : आसाममधील काँग्रेसच्या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अजंता निओग (Ajanta Neog) लवकरच भाजपात (BJP) प्रवेश करणार आहेत. पुढील वर्षी आसाममध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर निओग यांचा राजीनामा काँग्रेससाठी (Congress) मोठा धक्का आहे. (Former Assam minister And Congress leader Ajanta Neog met Amit Shah join bjp) पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपात काँग्रेसने अजंता निओग यांना शुक्रवारी पक्षातून काढले होते. कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

यानंतर निओग यांनी काँग्रस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.  काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. येत्या एक ते दोन दिवसांत मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे, असे निओग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. निओग यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. निओग यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी निओग यांनी आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. एक तासापेक्षा अधिक काळ त्यांची चर्चा झाली.

त्यानंतर निओग यांनी नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे हिमांता बिस्वा शर्मा यांचीही भेट घेतली होती. यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून काँग्रेसने निओग यांना पक्षातून काढले होते. (Former Assam minister And Congress leader Ajanta Neog met Amit Shah join bjp)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER