
गुवाहाटी : लवकरच आसाम विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या घोषणापत्रात काँग्रेसने (Congress) – सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ, निःशुल्क वीज, आणि नागरिकांसाठी न्याय योजना राबवण्याचे व प्रत्येक कुटुंबातील किमान एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा (Ripun Bora) यांनी आज पत्रकार परिषदेत घोषणापत्र जारी केले. मार्च- एप्रिल मध्ये हि निवडणूक होणार आहे. बोरा म्हणालेत, आसामातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून राज्यात एमएसपीची पद्धत राबवली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची अत्यल्प किंमत मिळते. उत्पादन खर्चही निघत नाही.
काँग्रेसने राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि मध्यप्रदेशात सत्तेवर आल्यानंतर तेथील शेतकऱ्यांची कर्ज माफ केली. तशीच माफी आम्ही आसामातील शेतकऱ्यांसाठी लागू करू. काँग्रेसने लोकसभा जाहींरनाम्यात किमान उत्त्पन्न योजना म्हणजेच ‘न्याय योजना’ लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ती योजना आम्ही आसामात राबवणार आहोत असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने आसामात गरिबांसाठी ‘निःशुल्क वीज योजना’ सुरू केली होती. त्यानुसार राज्यातील जनतेला तीस युनिट वीज निःशुल्क मिळते आहे. निःशुल्क विजेचे हे प्रमाण वाढवण्याची ग्वाहीही काँग्रेसने दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला