आसाम : भाजपाच्या आघाडीचे जागावाटप

BJP

गुवाहाटी : आसामच्या विधानसभा निडणुकीसाठी (Assam Assembly elections) भाजपा (BJP),अगप आणि यूपीपीएल आघाडीचे जागा वाटप झाले. आसाम गण परिषद (अगप) २६, यूपीपीएल ८ आणि भाजपा ९२ जागांवर लढणार आहे.

भाजपाने गुरुवारी या फॉर्म्युल्याला अंतिम स्वरुप दिले. भाजपा मुख्यालयात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेले होते. तिथे आसामच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. बैठकीला मंत्री हिंमत बिस्वा सरमा, आसाम प्रभारी बैजयन्त पांडा आणि सह प्रभारी पवन शर्माही उपस्थित होते.

गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या ६० जागा

आसामच्या विधानसभेत १२६ जागा आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ६० ने जागा जिंकल्या होत्या. बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) भाजपा आणि अगपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. बीपीएफने १२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी बीपीएफने काँग्रेस आणि एआययूडीएफसोबत आघाडी केली आहे. यावेळी भाजपाचा सामना काँग्रेस-एआययूडीएफ आघाडीशी होणार आहे.

तीन टप्प्यात मतदान

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात २७ मार्च, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल आणि तिसऱ्या टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २ मे रोजी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER