शतावरी – स्त्रियांकरीता वरदान

शतावरी

शतावरी (Asparagus), हे नाव बहुतेक स्त्रियांनी प्रसुतीवेळी ऐकले असेल. दूध वाढण्याकरीता शतावरी कल्प हे तर बाळंतीणीला हमखास देण्यात येणारे औषध. शतावरीचे क्षुप दिसायला देखील सुंदर असते.

शतमूली, शतवीर्या, बहुसुता, अतिरसा, नारायणी, सूक्ष्मपत्रा, पीवरी अशी विविध नावे आली आहेत. शतावरीचे काटेरी झुपकेंदार आरोहण करणारी वेल असते. याची मूळे जाड लांबट दोन्हीकडे निमुळती व पांढरी असतात. जे औषधार्थ वापरतात. शतावरीचे मूळा वरची साल व आतला कठीण भाग काढून मधल्या मांसल भागाचा आर्द्रावस्थेत वापर करतात.

  • शतावरीसिद्ध तेल मालीश करतात वापरतात. देवी किंवा काजण्यामधे दाह कमी होण्याकरीता पानांचा लेप करतात.
  • शतावरी थोडी गोड कडू रसाची आहे. शतावरी चूर्ण दूधात उकळून अम्लपित्त दूर करणारी आहे.
  • शतावरी उत्तम बृहण आणि ताकद वाढविणारी वनस्पती आहे. शरीराच्या सर्व सप्तधातूना बल देण्याचे काम शतावरी करते.

स्तन्यवर्धक म्हणून शतावरी प्रसिद्ध आहेच. शतावरी चूर्ण किंवा शतावरी कल्प दूधात टाकून घेतल्यास बाळंतीणीचे दूध वाढते. प्रसुतीनंतर आलेला अशक्तपणा कमी होतो. गर्भाशयला बल देण्याचे कार्य शतावरी करते. त्यामुळे प्रसुतीनंतर शतावरी खूपच फायदेशीर ठरते.

शुक्रधातुवर शतावरी कार्य करते त्यामुळे अनेक शुक्रधातुच्या व्याधीवर कार्य करणाऱ्या औषधांमधे शतावरी असतेच. शतावरी वाजीकर असल्यामुळे शुक्र धातूला बल देणे, शरीर पुष्ट करणे, शरीराची उष्णता कमी करणे हे सर्व शक्य होते.

वंध्यत्व, स्त्रियांना अति मासिक स्राव होणे, गर्भपात, बीजदोष अशा विकारांमधे शतावरी विविध कल्प रूपात उत्तम काम करते.

शतावरीघृत शतावरी कल्प, नारायण तेल, फलघृत अशा अनेक औषधी निर्माणात शतावरी प्रमुख घटकद्रव्य आहे. अशी ही स्त्री सखी रोगहारीणी नारायणी नक्कीच जाणून घ्यावी अशी वनस्पती.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER