
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) डरपोक आहेत. ते चीनचा सामना करू शकले नाहीत; त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. अशी टीका काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी केली. यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी उत्तर दिले – भारताची भूमी चीनला कोणी दिली, हे काँग्रेस नेत्याने आपल्या आजोबांना (नेहरूंना) विचारावे.
पंतप्रधान मोदी भारतीय भूमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करू शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
त्यांच्या आरोपाला उत्तर देताना जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी टोमणा मारला, “भारताची भूमी चीनला कोणी दिली हे त्यांनी आपल्या आजोबांना (जवाहरलाल नेहरू) विचारावे. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हे त्यांना समजेल.
लोकांना सर्व काही माहीत आहे. राहुल गांधी यांच्या विधानात संसदीय मर्यादा आणि परिपक्तवतेचा अभाव दिसतो. त्यांना काही समजत नाही आणि ते समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत.” अशी टीका मंत्री आर. के. सिंह यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला