आरक्षणाचे काय झाले हे विचारा, लोकप्रतिनिधींना बाहेर पडू देऊ नका; खासदार उदयनराजे आक्रमक

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) आक्रमक झाले. लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच अडवा, असे आदेश खासदार उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवला आहे. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिली आहे. भविष्यात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बऱ्याच पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी अद्यापही आपली भूमिका मांडली नाही. तसेच नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना उदयनराजेंनी टोला लगावला आहे.

“मराठा समाजाने आंदोलन करू नये, कोणत्याही पक्षाचे का असेना, त्या आमदार आणि खासदारांना रस्त्यात अडवा, जाब विचारा, मराठा आरक्षणाचे काय झाले हे विचारा आणि घरातून बाहेर पडू देऊ नका.” असा आदेश उदयनराजेंनी मराठा समाजाला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button