अरेंज मॅरेज करताय? मग, आपल्या होणाऱ्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा

marriage

लग्न हा आपल्या हिंदू धर्मातील १६ वा संस्कार समजला जातो. यामध्ये काही लोक लव्ह मॅरेजचा पर्याय निवडतात, तर काही अरेंज मॅरेज करतात. लव्ह मॅरेज करणाऱ्या जोडप्याला एकांतात एकमेकांना काही प्रश्न विचारण्याची किंवा त्यांना जाणून घ्यायची गरज पडत नाही. परंतु, आताच्या काळात अरेंज मॅरेज करणाऱ्या जोडप्याला लग्नापूर्वी एकमेकांशी भेटून प्रश्न विचारून काही गोष्टी स्पष्ट करण्याची आवश्यकता असते. तसेच, एकांतात भेटून परस्परांना जाणून घेण्यासही मदत होते. आपण हे लग्न करावे किंवा नाही, याचा निर्णय देखील तुम्ही सहजपणे घेऊ शकता.

तसेच, लव मॅरेज करताना मुलांना भावी पत्नीला एकांतात प्रश्न विचारण्याची गरज पडत नाही. मात्र, तुम्ही अरेंज मॅरेज करता तेव्हा याला सामोरे जावे लागते. यामध्ये मुलगी पाहायला जातात, तेव्हा दोन्ही कुटुंबामध्ये अनेक विचारांची देवाण-घेवाण होते. मुलीलाही काही प्रश्न विचारले जातात. आता वेळ येते ती, मुलाने एकांतात मुलीला बोलण्याची, यावेळी अनेकजण गोंधळून जातात आणि काहीही बोलून येतात. मात्र, यावेळी गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही. अशा वेळी नेमके काय बोलले पाहिजे, जेणेकरुन तुमचा प्रभाव चांगला पडेल? तर मग जाणून घ्या काय आहेत ते प्रश्न…

१. अशी करा प्रश्नाची सुरुवात :-
प्रथम भेटी दरम्यान मुलगीसुद्धा घाबरलेली असते, तेव्हा तिला उलट-सुलट प्रश्न न विचारता सर्वप्रथम तिला तिचे नाव विचारा. त्यानंतर एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा.  जर तुम्हाला वाटले की, मुलगी खुपच लाजाळू आहे तर आधी स्वतःविषयी सांगण्यास सुरुवात करा. मग हळुहळू तिला बोलते करा. तुम्हाला कळुन जाईल की, मुलगी कशी आहे.

२. करिअर :-
कुठल्याही मुलीला तिच्या करियरबद्दल विचारल्यास खूप आनंद होतो. त्यामुळे तिला तिच्या करियरबद्दल विचारा. तिला आपल्या करिअरबद्दल जोडीदार सिरीयस असल्याचा आनंद होतो. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल सांगा. तिच्या इच्छा, ध्येय याबद्दल जास्तीत-जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

३. विवाहाच्या अपेक्षा :-
प्रत्येक मुलीला वाटते की, आपल्या होणाऱ्या पतीने आपल्या लग्नाबद्दलचा सल्ला घ्यावा आणि आपल्या काय अपेक्षा आहेत, त्या जाणून घ्याव्या. तेव्हा तुम्हीसुद्धा तिला तिच्या काय अपेक्षा आहे, हे नक्की विचारायला हवे. यामुळे तुम्हालासुद्धा कळेल की मुलगी आपल्या लग्नाविषयी काय विचार करते.

४. आई-वडिलांविषयी :-
ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आई-वडीलांची काळजी करता त्याप्रमाणे मुलीलासुद्धा आपल्या आई-वडीलांची काळजी असते. त्यामुळे मुलीची काळजी कमी करण्यासाठी तुम्ही तिला विचारू शकता की, लग्नानंतर तुझ्या आई-वडीलांकडे कोण लक्ष देईल किंवा भविष्यात त्यांच्या विषयी काय विचार केला आहे.

५. आवड :-
एकमेकांना जाणून घेण्यासाठी परस्परांच्या आवडी-निवडी जाणून घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मोकळ्या वेळेत तुम्ही काय करता, ते एकमेकांना सांगा. परस्परांच्या फ्रेंड सर्कल याविषयी थोडे जाणून घ्या.

ही बातमी पण वाचा : म्हणून वधू- वराच्या वयात असावे अंतर