संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा! अजित पवारांचा टोमणा

Ajit Pawar - Sanjay Kakade

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) घुसमट होते आहे. ते आज ना उद्या नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असे खळबळजनक विधान भाजपाचे (BJP) माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी केले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काकडे यांना टोमणा मारला – संजय काकडे यांची विश्वासार्हता पुणेकरांनाच विचारा!

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना (Corona) आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि लसीकरणासंदर्भातील माहिती दिली. यावेळी, संजय काकडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाची माहिती अजित पवार यांना देण्यात आली. अजित पवार म्हणालेत, संजय काकडे यांच्या विधानाला फारसं महत्त्व  देण्याची गरज नाही. संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांनाच विचारा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button