आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ : भारताला महिला ४ बाय ४०० रिलेमध्ये सुवर्णपदक

women-relay

जकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदरी १३ सुवर्णपदक आले आहे. गुरुवारी महिलांच्या ४ बाय ४०० रिले शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळाले. आजच्या दिवशीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या पूर्वी जिन्सन जॉन्सन याने १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. जॉन्ससने ३ मिनिटे ४४ सेंकद इतकी वेळ नोंदवित सुवर्ण कामगिरी केली.

एकीकडे महिला संघाने हे अंतर ३ मिनिट २८. ७२सेकंदात पूर्ण केले. हिंदुस्थानच्या ४ बाय ४०० रिले संघात हिमा दास, पोवम्मा राजू, सरिताबेन गायकवाड आणि विस्माय कोरोथ हे सहभागी झाले होते. दुसरीकडे पुरुषांच्या ४ बाय ४०० रिले स्पर्धेत हिंदुस्थानला रौप्यपदक मिळाले आहे. पुरूष संघाने ३ मिनिट १. ८५ सेकंदाचा वेळ घेत रौप्य पदक जिंकले.