अश्विनी पोनप्पा, सिक्की रेड्डी व लक्ष्य सेनची विक्रमी कामगिरी

ऑल इंग्लंड ओपन (All England Open) या प्रतिष्ठेच्या बॕडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू (P.V.Sindhu) व लक्ष्य सेन (Lakshya Sen ) यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी ही जोडी आॕल इंग्लंड ओपनच्या अंतिम आठात स्थान मिळवणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे.

लक्ष्य सेन हा अवघ्या 19 वर्षे वयात आॕल इंग्लंड ओपनच्या अंतिम आठात पोहोचला आहे आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची क्वार्टर फायनल गाठणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय बॕडमिंटनपटू ठरला आहे.

लक्ष्यने फ्रान्सच्या थॉमस रुक्सेलवर 21-18, 21-17 असा 35 मिळविला. लक्ष्यचा पुढचा सामना आता नेदरलँडच्या मार्क कॕलौ याच्याशी होईल. लक्ष्यने आतापर्यंतचे मार्कविरुध्दचे सर्व सामने जिंकले आहेत आणि त्यामुळे तो उपांत्य फेरी गाठेल असे मानले जात आहे.

विश्वविजेती पी.व्ही. सिंधू हिने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत डेन्मार्कच्या लाईन ख्रिस्तोफरसेन हिचा 21-8, 21-8 असा धुव्वा उडवला. तिचा सामना आता माजी नंबर वन अकाने यामागुची हिच्याशी होईल. यामागुची हिने गेल्या सलग पाच वेळा या स्पर्धेची किमान उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे. सिंधूसुध्दा गेल्या पाच पैकी चार वेळा क्वार्टरफायनलपर्यंत पोहोचली आहे. 2018 मध्ये गाठलेली उपांत्यफेरी ही सिंधूची आॕल इंग्लंड ओपनमधील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. यामागूचीने सिंधूविरुध्दच्या अखेरच्या तीन लढती जिंकल्या आहेत पण एकूण लढतीत सिंधू 10-7 अशी पुढे आहे.

पोनाप्पा व सिक्की यांनी सहाव्या मानांकित स्टेफानी स्टोयव्हा व गॕब्रिएला स्टोयव्हा ह्या जोडीला 21-17, 21-10 असे पराभूत केले. पोनप्पा व सिक्की यांचा सामना आता सेलेना पीक व चेरील सिनेन या डच जोडीशी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER